पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Big boss marathi 2 : वीणासाठी नष्ट करणार का अभिजित मुलांचे फोटो? शिवानीला वाचवणार का कवी मनाचे नेते?

अभिजित केळकर

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन सुरू झाला  आहे. पहिल्या दिवशी  घरात स्थिरावल्यानंतर  दुसऱ्या दिवसानंतर आता खऱ्या अर्थानं खेळाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी सदस्यांना  'सवाल ऐरणी'चा हा टास्क देण्यात आला आहे ज्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी प्रत्येक टीममधून एक एक सदस्याचे नावं बिग बॉस घेत आहेत.

 ज्या सदस्याची निवड होईल  त्या सदस्याने संदेश पत्रात असलेल्या सदस्याला लिहिलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे. या सवाल ऐरणीचा टास्क मध्ये शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या दोघींना अनुक्रमे टीम लीडर अभिजित बिचुकले आणि टीम लीडर वैशाली म्हाडे यांना संदेश पत्रात दिलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे. 

सध्या घरात कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे  अभिजित बिचुकले विरुद्ध संपूर्ण घर असं चित्र आहे.  त्यातून पहिल्याच  दिवशी  अभिजितनं अनपेक्षितपणे  शिवानी सुर्वेला नॉमिनेट केल्यानं दोघांमध्ये वितुष्ट आलं आहे.  दुसऱ्या दिवशी अभिजितनं  आपल्या 'प्लान' प्रमाणे शिवानीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला  मात्र यात ते पुरते अपयशी ठरले. शिवानीनंही काट्यानं काटा काढून खेळी खेळायंचं ठरवलं  आहे. 

त्यामुळे आता  अभिजित बिचुकले शिवानी सुर्वेला नॉमिनेशन मधून वाचविण्यास तयार होतील का हे पाहणं  औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे नेहा शितोळेला वाचविण्यासाठी वैशाली म्हाडे तयार होईल ? हे बघणे रंजक असणार आहे. पहिल्याच दिवशी नेहानं वैशालीला नॉमिनेट केलं  होतं.  शिवाय नॉमिनेटचं  कारण सांगताना वैशाली घेत असलेल्या भूमिकांवर तिनं प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्यामुळे विरुद्ध टीममध्ये असलेल्या दोघांना  टीम लीडर अभिजित बिचुकले आणि वैशाली म्हाडे वाचवतील का हे पाहण्यास खऱ्या अर्थानं मज्जा येणार आहे. 

याच टास्क दरम्यान अभिजित केळकर आणि रुपाली भोसले खूप भावूक झाले आहेत. कारण विणा जगताप आणि मैथिली जावकर यांच्यासाठी अनुक्रमे अभिजित आणि रुपाली यांना बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत.  या टास्कमध्ये अभिजित केळकरला त्याच्या मुलांचे आणि कुटुंबाचे फोटो तर रुपालीला तिच्या भावाने दिलेला टेडी नष्ट करायचा आहे. दोघांसाठी या गोष्टी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे विणा आणि मैथिलीला वाचवण्यासाठी दोघंही आपल्या प्रिय गोष्टी नष्ट करणार का  हेदेखील  पाहण्यासारखं  ठरेन.