पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Big boss marathi 2 : नवा टास्क, विद्याधर जोशी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या वेशात

विद्याधर जोशी

बिग बॉस मराठीच्या घरातील नव्या सदस्यांना नॉमिनेशन टास्क, वाद – विवाद, भांडणं, मतभेद अशा गोष्टींची प्रचिती पावलो पावली येत आहे. पहिल्या दिवशी घरात स्थिरावल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून खेळाला खऱ्या अर्थानं सुरूवात झाली आहे. घरात दुसऱ्या दिवशी दोन गट पडले आहे. पहिला गट आहे अभिजित बिचकुलेचा तर दुसरा गट आहे वैशाली म्हाडेचा आहे. या दोघांनाही खेळाच्या सुरूवातीलाच घरातील सदस्यांनी  बहुमतानं खेळासाठी अपात्र ठरवलं होतं. मात्र आता  हे दोघंही टीम लीडर असून दोघांच्या टीममधील प्रत्येक सदस्याला टास्क पूर्ण करावा लागणार आहे. 

Big boss marathi 2 : वीणासाठी नष्ट करणार का अभिजित मुलांचे फोटो? शिवानीला वाचवणार का कवी मनाचे नेते?
 

तिसऱ्या दिवशी  सुरेखा पुणेकर - विद्याधर जोशी आणि किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हानं देणार आहे. विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांना विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे.

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विध्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताई विद्याधर यांना  'रावजी' ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला अशीही 'बनवा बनवी' या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत. 

या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं होईल यात शंका नाही. तर दुसरीकडे  टीममधील  शिवानी सुर्वे, नेहा शितोळे, वीणा जगताप  आणि मैथिली जावकर यांनादेखील वेगळे टास्क देण्यात आले आहेत. हे टास्क  घरातील सदस्य पूर्ण करणार का हे आजच्या भागात पहायला मिळणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 day three new task for vidhyadhar joshi surekha punekar kishori shahane