पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवानी सुर्वेला प्रवेश दिला मग मला का नाही?, परागचा सवाल

शेफ पराग कान्हेरे

शेफ पराग कान्हेरे याला घरातील सर्वात महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. परागनं एका टास्कदरम्यानं राग अनावर झाल्यानं  घरातील सदस्य नेहा शितोळेच्या कानशीलात लगावली होती. त्याचं खेळातून  त्वरित निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर परागला घरातील सदस्याचं मन वळवण्याकरता एक संधीही देण्यात आली होती. मात्र घरच्यांनी त्याला मफी देण्यास नकार दिला मात्र आता पराग घरात परतण्याची शक्यता निर्माण झालीय.

'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'

परागनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरली आहे. येतोय मी आता सर्वांचा हिशेब होणार, तू, तो आणि ती पण जाणार अशी पोस्ट परागनं इन्स्टाग्रामवर लिहिली या पोस्टनंतर तो बिग बॉसच्या घरात परतणार अशा चर्चा आहेत. जर विणा जगतापवर लाथ उचलणारी आणि बिग बॉसला कायद्याची धमकी देणारी शिवानी घरात येऊ शकते तर मी का नाही?,  असा सवाल त्यानं टाइम्स ऑफ इंडियाला  दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे. 

अक्षय-प्रभास टक्कर टळली, 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

मला या शोमध्ये परत जायचं आहे माझी तशी इच्छा देखील आहे. याच गोष्टीमुळे मी गोव्यात परतलो देखील नाही. माझी कामंही मी पुढे ढकलली आहेत असंही पराग म्हणाला.  दोन गुन्ह्यांच्या आरोपांमुळे अभिजित बिचुकलेला अटक झाली. मात्र अभिजितची बॅग अजूनही घरात आहे. त्याच्या नावाची पाटीही घरात दिसत आहे म्हणजेच तो अजूनही या शोचा भाग आहे. मग मलादेखील संधी दिलीच पाहिजे असंही पराग या मुलाखतीत म्हणाला.