पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाजेखातर प्रेक्षकांना ग्राह्य धरा, बिग बॉसवर परागची टीका

पराग कान्हेरे

नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे या दोघीही बिग बॉस मराठी २ च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. तत्पूर्वी पार पडलेल्या 'तिकीट टु फिनाले' या टास्कबाबत शेफ परागनं नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसमधला महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे पराग कान्हेरेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. बिग बॉसनं त्याला घरातल्या सदस्यांची माफी मागून त्यांचे मन वळवण्याची एक संधी दिली होती. मात्र परागला घरात  घेण्यास सर्वांनी नकार दिला.

बिग बॉस मराठी : हे दोन स्पर्धक पोहोचले फिनालेमध्ये

या शोमधून बाहेर पडल्यानंतर परागनं अनेकदा नाराजी व्यक्त केली. आता इन्स्टाग्रामवर परागनं काही पोस्ट लिहिल्या आहेत. शिवानी किंवा विणाच या शोच्या विजेत्या होतील असं परागनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे 'तिकीट टु फिनाले'  हा टास्क म्हणजे माझाच बॉल, माझीच बॅट आणि माझाच स्टम्प अशी परिस्थिती आहे. लाजेखातर थर्ड अम्पायर म्हणून प्रेक्षकांचं मतही ग्राह्य धरा असं परागनं आपल्या इन्स्टापोस्टमध्ये म्हटलं आहे. 

प्रियांकाला कंगनाचा पाठिंबा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

इथे सगळे पढवून आणलेले पोपट आहेत, मी या मूर्खपणात सहभागी नाही याचा आनंद होतोय असंही परागनं म्हटलं आहे.