पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिनासाठी अभिजीत बिचुकलेंची हायकोर्टात धाव

अभिजित बिचुकले

बिग बॉस मराठी २ मधले वादग्रस्त स्पर्धक आणि कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले यांनी जामीन मिळवण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती एबीपी माझा या  खासगी वृत्तवाहिनीनं दिली आहे.

हो हे खरंय! त्या निर्मात्याला माझ्या पोटावर अंडं फ्राय करायचं होतं, मल्लिकाचा खुलासा 

गेल्याच महिन्यात २१ जून रोजी अभिजित बिचुकलेंना चेक बाउन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या सेटवरुन अटक केली होती. या प्रकरणात त्यांना जामिन मंजूर करण्यात आला मात्र जुन्या खंडणीप्रकरणात त्यांचा जामिन फेटाळण्यात आला. जामीन अर्ज फेटाळल्याने त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्या न्यायालयात बिचुकलेंनी जामिनासाठी धाव घेतली होती. तिथेही गेल्याच आठवड्यात जामीन अर्ज फेटाळण्यात आला. बिचुकलेंचा जामिन अर्ज फेटाळ्यात आल्यानंतर बिग बॉसमध्ये परतण्याची त्यांची शक्यता जवळजवळ मावळली आहे.  

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकची वर्णी, होणार 'सीक्वलचा राजा'

आता बिचुकलेंनी जामिनासाठी  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा माझ्याविरोधातला राजकीय कट आहे जुने प्रकरण मुद्दाम उकरून काढले जात आहे असा आरोप दरम्यानच्या काळात अभिजित बिचुकलेंनी केला आहे.