पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बी आणि भाईजानलाही रिंकूच्या 'मेकअप'ची भुरळ

मेकअप

१०० टक्के बिनधास्त...  १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. ट्रेलरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकच वाढली, अनेक चाहत्यांना ट्रेलर आवडलाही , विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खानसह  बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

वेदनाशामक औषधं घेऊन आमिर करतोय 'लाल सिंग चड्ढा'चं शूट

 गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' चित्रपटाचा ट्रेलर बिग बी, सलमान खान यांनीच नाहीतर इशा देओल, आफताब शिवदासानी यांनीदेखील शेअर केला आहे. त्यामुळे आता बॉलिवूडही 'मेकअप'च्या रंगात रंगले आहे, असे म्हणायला हरकत नाही. ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिंनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, मेकअप'वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे, हे जरा प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा 'हॉट' राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.

संगीताचा दर्जा खालावल्यानं बॉलिवूडपासून लांब, आशा भोसलेंची कबुली

 प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज  असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून हा चित्रपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दीपिकाचा 'छपाक' वादात, स्वामित्त्व हक्क भंग केल्याचा आरोप