पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भूमीनं स्पाटबॉयचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न केलं साकार

भूमी पेडणेकर

अभिनेत्री भूमी पेडणेकरनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्पॉटबॉयला त्याच्या व्यवसायासाठी आर्थिक आणि मानसिक सहाकार्य करणाऱ्या भूमीवर कौतुकांचा  वर्षाव होत आहे. भूमीनं  दाखवलेला विश्वास आणि तिनं केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे स्पॉटबॉय असलेल्या उपेंद्र सिंह यानं कलाकारांसाठी व्हॅनिटी वॅन तयार  करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. त्यानं पहिली व्हॅनिटी भूमीसाठी तयार केली आहे. 

होय मी प्रेमात आहे, अभिनेत्री मानसी नाईकची कबुली

खूप वर्षांपासून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं माझं स्वप्न होतं. या स्वप्नपूर्तीसाठी भूमी दीदीनं मला सहाकार्य केलं. तिच्या प्रोत्साहनामुळे मी आज स्वत:ची कंपनी सुरु करत आहे. तिचे उपकार मी कधीही विसरणार नाही, अशी भावना  उपेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. 

लग्नाला यायचं हं! एप्रिलमध्ये बांधणार सायलीचा 'बस्ता'

प्रत्येकाला आयुष्यात एकतरी संधी मिळाली पाहिजे असं मी मानते. दुसऱ्यांसाठी शक्य असेल ते प्रयत्न आपण करायलाच हवे. त्याला पुढे जाताना पाहून मला देखील यशस्वी झाल्यासारखं वाटतं आहे, अशा शब्दात भूमीनं आपला  आनंद व्यक्त केला.