पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती

 'गंगूबाई काठीयावाडी' त आलिया प्रमुख भूमिकेत

कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या  महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नाही. नववारी साडी आणि कपाळावर मोठी टिकली लावून वावरणाऱ्या गंगूबाई या  देहविक्रेय करणाऱ्या  महिलांच्या वस्तीत दंतकथा बनून  राहिल्या. आजही त्यांचं नाव आदरानं तिथे घेतलं जातं. अभिनेत्री आलिया भट्ट ही दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात गंगूबाईंची भूमिका साकारत आहे. आलियाच्या नावाची चित्रपटासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटासाठी  आलियाला  पहिली पसंती नव्हती. 

विक्की वेलिंगकर : अवधूत-ओमकारच्या आवाजतलं 'टीकिटी टॉक' ऐकलंत का?

अभिनेत्री राणी मुखर्जीनं गंगूबाईंची भूमिका साकारावी अशी भन्साळींची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. राणीनंतर भन्साळी दुसऱ्या सक्षम अभिनेत्रीच्या शोधात होते. 'बाजीराव मस्तानी' चित्रपट करताना भन्साळींच्या डोक्यात प्रियांका चोप्राचं नाव आलं. मात्र प्रियांकाचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ऑफर्स प्रियांकाच्या पदरी आहेत.

प्रियांकाच्याही तारखा उपलब्ध नसल्यानं अखेर आलियाच्या नावाचा  विचार भन्साळींनी केला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली. 
आधी आलिया भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी 'इंशाअल्लाह' चित्रपटात सलमानसोबत झळकणार होती. मात्र काही कारणानं हा चित्रपट न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आता आलिया भट्ट ही 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटात दिसणार आहे.  हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे. 

राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप

कोण आहेत गंगूबाई
पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  या कांदबरीत  गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन  कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं.  गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी  पुढे  याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या.
मनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या.

बॅडमिंटन सरावादरम्यान परिणितीला इजा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Before Alia Bhatt Sanjay Leela Bhansali Was Keen On Casting These Two Bollywood Actresses for Gangubai Kathiawadi