पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : रजनीकांत- बेअरच्या 'Into the Wild'चा दमदार टीझर पाहिलात का?

इन टु द वाइल्ड

डिस्कव्हरी चॅनेलवरील 'Into the Wild' या कार्यक्रमाचा विशेष भाग  लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे यात 'सुपरस्टार रजनीकांत' 'डेअर डेव्हिल' बेअर ग्रिल्ससोबत  जंगल सफारीचा रोमांचकारी अनुभव घेताना दिसणार आहेत.  'मॅन वर्सेस वाईल्ड'  हा प्रसिद्ध शो करणारा साहसवीर बेअर ग्रिल्स जानेवारी महिन्यात भारतात आला होता, त्यानं कर्नाटकातील बांदीपुराच्या जंगलात  सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'Into the Wild' चं विशेष चित्रीकरण केलं होतं.

‘टकाटक’ मधली रितीका होणार ‘डार्लिंग’

हा विशेष भाग पाहण्यासाठी चाहत्यांना आखणी दोन आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, मात्र बेअर ग्रिल्सनं या शोची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. ब्रेअरनं 'Into the Wild' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

 पाहा टीझर


कधी पाहता येणार शो 
२३ मार्चला रात्री ८ वाजता डिस्कव्हरीवर 'Into the Wild' या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. जगभरात फिरलेल्या बेअर ग्रिल्सनं पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्यासोबत  चित्रीकरण केलं. 'Into the Wild' च्या विशेष भागात अक्षय कुमारही दिसणार आहे. विशेष म्हणजे रजनीकांत पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात दिसणार आहे. 

त्यांनी आमच्यावर अंडी फेकली, दीपिकानं सांगितली मुंबईतल्या होळीची आठवण