पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींनंतर 'Man vs Wild' मध्ये सुपरस्टार रजनीकांत

'Man vs Wild' मध्ये सुपरस्टार रजनीकांत

डिस्कव्हरी चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'मॅन वर्सेस वाईल्ड'मध्ये रजनीकांत दिसणार आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत  बेयर ग्रिल्स विशेष भागाचं चित्रीकरण करणार आहे. बेयर ग्रिल्स गेल्या कित्येक वर्षांपासून हा शो करत आहेत.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा, प्रतिकूल वातावरणात तग कसा धरायचा हे बेयर ग्रिल्स आपल्या शोमधून दाखवतो. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विशेष भागाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं.

पूजा भट म्हणते, ...म्हणून मी कधीच CAA-NRCला पाठिंबा देणार नाही

आता रजनीकांत यांच्यासोबत विशेष भागाचं  चित्रीकरण करण्यासाठी बेयर ग्रिल्स  कर्नाटकात आला आहे. कर्नाटकातील बांदीपुराच्या जंगलात या विशेष भागाचं चित्रीकरण पार पडणार आहे. बेयर ग्रिल्सचा हा कार्यक्रम जगभरातील १६५ देशांत प्रदर्शित होतो. 

२८ ते ३० जानेवारीदरम्यान बांदीपुराच्या जंगलात चित्रीकरण पार पडणार आहे. यासाठी दिवसातून ६ तास चित्रीकरणाची परवानगी 'मॅन वर्सेस वाईल्ड'च्या टीमला देण्यात आल्याचं समजत आहे. २८ तारखेला रजनीकांत यांच्यासोबत चित्रीकरण होणार आहे तर ३० तारखेला अभिनेता अक्षय कुमारही यात सहभागी होणार असल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. 

प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची बळजबरी केल्याने गणेश आचार्य अडचणीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bear Grylls arrives at Bandipur forest in Karnataka for a shoot with actor Rajinikanth for special show Man vs Wild