पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेडी गागा आणि बप्पी लहरी वर्षाअखेरिस घेऊन येणार हिंग्लिश गाणं

लेडी गागा- बप्पी लहरी

 जगप्रसिद्ध अमेरिकन गायक लेडी गागा आणि बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणारे संगीतकार गायक बप्पी लहरी लवकरच नवीन गाणं घेऊन येणार आहेत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार बप्पी आणि लेडी गागानं गाणं ध्वनीमुद्रीत केलं आहे. या वर्षाअखेरीस हे गाणं श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

गेल्या पाच वर्षांत केवळ ८ बॉलिवूड चित्रपटांची कमाई ३०० कोटींच्या घरात

 या गाण्यासाठी मी आणि लेडी गागानं आवाज दिला आहे. तिनं इंग्रजीत तर मी  हिंदीत गाणं गायलं आहे. वर्षाअखेरीस हे गाणं प्रदर्शित होईल अशी मी आशा करतो. दोन महिन्यांपूर्वी मी एकॉनसोबतही करार केला आहे. त्यामुळे त्याच्यासोबतही नवं गाणं पाहायला मिळेल असा विश्वास बप्पी यांनी व्यक्त केला आहे. 

तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर, अजयचा पहिला लूक प्रदर्शित

बप्पी लहरी यांची जुनी गाणी भारतातच नाही तर परदेशी तरुणांमध्येही खूपच लोकप्रिय आहे. अनेक विदेश बँड त्यांची काही गाणी आवर्जून वाजवतात. त्यामुळे लेडी गागा  आणि बप्पी लहरी यांचं इंग्रजी हिंदी मिश्रित हिंग्लिश गाणं ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.