पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून भूमिलाच दिली संधी, टीकांवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

भूमि पेडणेकर

आयुष्मान खुराना, यामी गौतम, भूमि  पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बाला' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र हा चित्रपट विविध कारणांमुळे वादातही सापडला होता. वादाच्या अनेक कारणांपैकी एक वाद भूमि पेडणेकरच्या निवडीवरूनही झाला होता.

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यंत नाजूक

रंग खूपच सावळा असल्यानं लग्नासाठी वारंवार नकार मिळणाऱ्या मुलीच्या भूमिकेत भूमि होती. मात्र या भूमिकेसाठी भूमिच्या चेहऱ्यावर गडद मेकअपकरून तिला सावळं करण्यात आलं होतं. तिला संधी देण्यापेक्षा एका सावळ्या वर्णाच्या अभिनेत्रीला ही संधी का दिली नाही असा प्रश्न प्रेक्षकांचा होता. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद विवादही रंगला. या वादावर दिग्दर्शक अमर कौशिक यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. 

रानूच्या त्या व्हायरल फोटोमागचं सत्य अखेर समोर

सुरुवातीला भूमिला पसंती नव्हती. तिच्याऐवजी  सावळ्या वर्णाच्या अभिनेत्रीलाच संधी देण्यात येणार होती. आता त्या व्यक्तीचं  नाव उघड करणं योग्य ठरणार नाही. मात्र एखाद्या भूमिकेसाठी ती अभिनेत्री देखील तितकीच योग्य वाटली पाहिजे, तिचा अभिनयही तितकाच प्रभावी असला पाहिजे. भूमिचा अभिनय हा प्रभावी आणि त्या तोडीचा होताच म्हणूनच तिची निवड करण्यात आली अशी माहिती  दिग्दर्शकांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.