पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी

प्राजक्ता माळी

फॅशन डिझायनरला मारहाण केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी वादात सापडली आहे. प्राजक्ता माळी हिच्याविरोधात एप्रिल महिन्यात फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिनं एनसी दाखल केली. मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप जान्हवीनं केला होता. त्यानंतर मनचंदा यांनी माळी हिच्याविरुद्ध ठाणे न्यायालयात धाव घेत तक्रार केली होती. न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. या प्रकरणात वारंवार नोटीस बजावूनदेखील कोर्टात हजर न राहिल्याने प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. 

चुकून सीमा ओलांडून गेलेल्या भारतीयांवरून पाकचे 'नापाक' राजकारण

एका कार्यक्रमादरम्यान कपडे योग्य नसल्याच्या  कारणावरून प्राजक्ता माळीनं मारहाण केल्याचा आरोप जान्हवीनं काही महिन्यांपूर्वी केला होता. या दोघींमधल्या संवादाचे स्क्रीनशॉटही व्हायरल झाले होते. मात्र प्राजक्तानं जान्हवीनं केलेले आरोप फेटाळून लावले होते. जान्हवी आणि माझे कपड्यावरून वाद झाले मात्र  मी तिला मारहाण केली नाही असं स्पष्टीकरण प्राजक्तानं दिलं होतं. 

‘झुंड’वादाच्या भोवऱ्यात, बच्चन यांना नोटीस तर नागराज मंजुळेंवर गंभीर आरोप