पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी बाहुबली फेम अभिनेता मधू प्रकाशला अटक, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

मधू प्रकाश

 हैदराबाद पोलिसांनी तेलगू अभिनेता मधू प्रकाश याला  अटक केली  आहे. हुंड्यासाठी पत्नीची छळवणूक केल्याचा आरोप मधूवर आहे.  मधू प्रकाश याच्या पत्नीनं आत्महत्या केल्यानंतर  त्याला अटक करण्यात आली आहे. मधूनं 'बाहुबली' चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. मधूनं पत्नी भारतीचा हुंड्यासाठी छळ केला आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा आरोप भारतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर बुधवारी मधूला अटक करण्यात आली. 

कलम ३७० : चित्रपटाच्या शिर्षक नोंदणीसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

पोलिसांनी मधूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मधू आणि भारतीचं २०१४ मध्ये लग्न झालं होतं. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मधू हुंड्यासाठी भारतीला त्रास देत असल्याचं भारतीच्या पालकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

कलम ३७० : अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं

मधू घरी नेहमीच उशीरा येत असे तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध होते असाही, आरोप भारतीच्या पालकांनी केला आहे. लग्नात १५ लाखांची रक्कम मधूला हुंडा म्हणून देण्यात आली होती. मात्र त्यानं अधिक रक्कमेची मागणी केली. यावरून तो  सतत भारतीला त्रास द्यायचा, भारतीनं आत्महत्या केली असली तरी तिच्या आत्महत्येविषयी आम्हाला संयश येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी विनंतीही तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.