पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून 'बधाई हो' फेम सुरेखा सीकरी कामातून घेतला १० महिन्यांचा ब्रेक

सुरेखा सीकरी

 ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना यंदाचा सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. 'बधाई हो' मधील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार घोषीत करण्यात आला. मात्र 'बधाई हो' प्रदर्शित झाल्यानंतर १० महिने त्यांनी कामातून विश्रांती घेतली. ब्रेन स्ट्रोकमुळे गेल्या १० महिन्यात एकाही चित्रपटासाठी होकार दिला नाही असं त्या म्हणाल्या.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

काही दिवसांपासून मी आजारी आहे. महाबळेश्वरमध्ये एका चित्रीकरणादरम्यान मी पडले त्यामुळे डोक्याला मार लागला. गेल्या दहा महिन्यांपासून मी आजारानं त्रस्त आहे.  आजारपणामुळे मी काम करु शकत नाही. काही दिवसांत माझ्या प्रकृतीत सुधारणा होईन आणि मी काम करू शकेन पण तोपर्यंत मी आराम करत आहे' असं सुरेखा म्हणाल्या.

..म्हणून श्रीदेवी- जयाप्रदा यांना राजेश खन्ना यांनी एका खोलीत कोंडलं

सुरेखा यांचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. १९८८ मध्ये 'तमस'साठी आणि १९९५ मध्ये 'मम्मो'साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.