पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अभिनेता होण्यासाठी वडिलांनी धक्के मारून घराबाहेर काढलं होतं'

आयुष्मान खुराना

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस आहे. सर्वसामान्यांचा हिरो म्हणूनही तो सोशल मीडियावर  लोकप्रिय आहे. उत्तम अभिनेता, गायक, कवी आणि निवेदक म्हणून त्यानं स्वत:ची ओळख  तयार केली आहे. अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आयुष्मानला त्यांच्या वडिलांनी अक्षरश:  धक्के मारून घराबाहेर काढलं होतं, असा आठवणीत राहण्याजोगा किस्सा त्यानं सांगितला.

'गर्ल्स' आणि 'फत्तेशिकस्त' मधली टक्कर टळली

मला अभिनेता व्हायचं होतं मात्र चंढीगडमध्ये राहून हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नव्हतं. वडिलांचा नेहमीच मला पाठिंबा असायचा. मी अभिनेता व्हावं माझं स्वप्न पूर्ण करावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती म्हणून त्यांनी स्वत:हून मुंबईसाठी माझं तिकीट काढलं,  बॅग भरली आणि मला घराबाहेर काढलं. चंढीगडमध्ये राहून तुझं काहीही होणार नाही, आता खूप झालं तू आता अभिनेता होण्यासाठी इथून निघून गेलं पाहिजे, असं वडिलांनीच मला सांगितलं होतं असा किस्सा आयुष्माननं सांगितला. 

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीस

आयुष्मान आता ३५ वर्षांचा आहे. वयाच्या १९ वर्षी  या क्षेत्रातील त्याच्या करिअरला सुरूवात झाली. '१९ व्या वर्षी मी रोडिज या शो मध्ये सहभागी झालो होतो. २७ व्या वर्षी मी अभिनेता झालो.  अभिनेता होण्यासाठी मला ७ वर्षे लागली', असंही त्यानं सांगितलं. रेडिओ, टीव्ही, रंगभूमी अशा अनेक माध्यमात आयुष्माननं काम केलं. या विविध क्षेत्रांत काम केल्यामुळे मी आता अधिक चांगल्याप्रकारे काम करु शकतो असंही तो म्हणाला.