पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मानचा 'अंधाधुन' चित्रपट दक्षिण कोरियात होणार प्रदर्शित

आयुष्मान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा सुपरहिट चित्रपट 'अंधाधुन' दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित सस्पेन्स-थ्रिलर 'अंधाधुन' चित्रपट गेल्या वर्षी भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये आयुष्मानसोबत तब्बू आणि राधिका आपटे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘अंधाधुन’ चित्रपट चीनमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. त्याठिकाणी सुध्दा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

‘अंधाधुन’ ही अशा एका व्यक्तीची कहाणी आहे जो पियानो वाजवितो आणि तो आंधळा असल्याचे नाटक करत असतो. मात्र नकळत तो एका हत्येचा प्रत्यक्षदर्शी बनतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये भूकंप येतो. ‘अंधाधुन’ चित्रपटाला समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि चित्रपटाची उत्कृष्ट समीक्षा  देण्यात आली होती. 

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

‘अंधाधुन’ चित्रपटाला चांगले यश मिळाले असून आता हा चित्रपट दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कोरियन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘अंधाधुन’ चित्रपट येत्या २८ ऑगस्ट रोजी दक्षिण कोरियामध्ये ९० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. 

छत्तीसगडः नारायणपूर येथे चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा