पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित

ड्रिम गर्ल

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचाचा 'ड्रिम गर्ल' चित्रपट पुढील महिन्यात हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होत आहे. १३ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ड्रिम गर्ल'चे शो आजही भारताच्या अनेक चित्रपटगृहात सुरू आहेत. या चित्रपटानं एकूण १३९ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

प्रियांका- निकनं तब्बल ११४ कोटींचं घर घेतल्याची चर्चा

 'ड्रिम गर्ल'  ५ डिसेंबरला हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होत आहे. यापूर्वी बर्फी, दंगल, सिक्रेट सुपरस्टार, हिचकीसारखे बॉलिवूड चित्रपट इथे प्रदर्शित झाले आहेत. आयुष्माच्या 'ड्रिम गर्ल'ला भारतात खूपच चांगला प्रतिसाद लाभला. आयुष्मानचे २०१८- १९ या  वर्षांत प्रदर्शित झालेले जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले होते. अंधाधून,  बधाई हो, आर्टिकल १५, ड्रिम गर्ल, बाला  हे आयुष्मानचे चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले. या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

अमिताभ बच्चन यांनी सलग १८ तास केलं 'केबीसी'चं चित्रीकरण

'ड्रिम गर्ल' हा हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार असल्यानं चित्रपटाची संपूर्ण टीमही उत्सुक आहे. आयुष्मान लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो सिताबो' चित्रपटातही दिसणार आहे.