पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'ड्रिम गर्ल'ची सेंच्युरी

ड्रिम गर्ल

आयुष्मान खुरानाच्या  'ड्रिम गर्ल'नं बॉक्स ऑफिसवर कमाईची सेंच्युरी पार केली आहे. आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पहिल्या तीन दिवसांत अल्प बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ४० कोटींहून अधिकची कमाई करून नवा विक्रम रचला होता.

या भूमिकांसाठी तरी आमचा विचार करा, नीना गुप्तांची जाहीर नाराजी

हा चित्रपट दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला. श्रद्धा कपूर सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे', सोनमचा 'दी झोया फॅक्टर' आणि संजय दत्तचा 'प्रस्थानम' या चित्रपटांचं आव्हान  समोर असतानाही 'ड्रिम गर्ल'नं चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. बॉलिवूडमधल्या इतर चित्रपटांपेक्षा तुलनेनं कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 

Review : द फॅमिली मॅन

विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा हा आयुष्मानचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यापूर्वी  आयुष्मानच्या 'बधाई हो' चित्रपटानं ३२ कोटी, 'आर्टिकल १५' ने १९.८४ कोटी आणि 'अंधाधून'नं १४.६४ कोटींची कमाई केली. साधरणत: अनेक बॉलिवूड चित्रपट हे मुंबई, दिल्ली सारख्या शहरात चांगली कमाई करतात. मात्र आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'नं म्हैसूर, पंजाब, बिहारमधूनही चांगली कमाई केलेली पाहायला मिळत आहे. 

जूही चावला पुन्हा होणार खलनायिका

त्याचप्रमाणे भारतात १०० कोटींचा गल्ला जमवणारा हा आयुष्मानचा दुसरा चित्रपट  ठरला आहे. यापूर्वी 'बधाई हो'नं  १३७ कोटींची कमाई केली होती.