पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका चोप्राच्या वादावर अभिनेता आयुष्मान म्हणतो...

आयुष्मान खुराना- प्रियांका चोप्रा

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा ही वादाच्या केंद्रस्थानी  आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क  विभागाच्या  मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून तिला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बॉलिवूड प्रियांकाच्या समर्थनार्थ पुढे आलं आहे. कंगना राणौत, जावेद अख्तर, अली अब्बास जफारनंतर आता अभिनेता आयुष्मान खुरानाही प्रियांकाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. 

सदिच्छा दूत पदावरून प्रियांकाला हटवा, पाकच्या मंत्र्याचं युनिसेफला पत्र

प्रियांका ही ग्लोबल स्टार आहे. ती भारताचं देखील प्रतिनिधित्त्व करते. ती एका सैन्य अधिकाऱ्याची मुलगी आहे त्यामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्त्व करणारी प्रियांकापेक्षा दुसरी चांगली व्यक्ती असूच शकत नाही, अशा शब्दात आष्युमाननं तिचं कौतुक केलं आहे.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना मदत करण्याचं कपिल शर्माचं आवाहन 

प्रियांका ही चांगलं काम करत आहे असंही आयुष्मान म्हणाला.  प्रियांकासोबत काम केलेले दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी देखील प्रियांकाला पाठिंबा दिला आहे. प्रियांका ही भारतीय आहे आणि आपल्या देशाचं  किंवा सैन्याचं  कौतुक करण्यात काहीही गैर नाही असं भंडारकर म्हणाले.