पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मान खुरानाचा 'बाला' पुन्हा वादात, स्वामित्व हक्क भंगाचा तिसरा आरोप

आयुष्मान खुरानाचा 'बाला' पुन्हा वादात

आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका असलेला 'बाला' चित्रपटाचा ट्रेलर नुकताचा लाँच झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, मात्र दुसरीकडे हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर सलग तिसऱ्यांदा स्वामित्व हक्क भंगाचा  आरोप होत आहे.उजडा चमन  चित्रपटाच्या निर्मात्यांनी  बालाच्या निर्मात्यांवर स्वामित्त्व हक्काचा भंग केल्याचा आरोप केला आहे. 

'बिग बीं'बद्दल न ऐकलेल्या रंजक गोष्टी

अकाली टक्कल पडणाऱ्या तरुणांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. याच कथेशी साधर्म्य दाखवणारा  सनी सिंगचा उजडा चमन हा चित्रपटही येत आहे.  'बाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वामित्व हक्काचा भंग केल्याचं सरळ सरळ स्पष्ट होत आहे. एकाच प्रकारची व्यतिरेखा असलेले दोन विविध चित्रपट कमी कालावधीत प्रदर्शित होतात ही बाब मी समजू शकतो. मात्र माझ्याकडे या कथेचे स्वामित्व हक्क आहेत.  उजडा चमन आणि बाला यांतील अनेक गोष्टीत साधर्म्य आहे, त्यामुळे कायदे तज्ज्ञांशी बोलून आम्ही कायदेशीर पाऊल उचलू असं उजडा चमनचे निर्माते अभिषेक मंगत मुंबई मिररला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. 

दीपिकाच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत विक्री, संस्थेला करणार मदत

यापूर्वी तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक  प्रवीण मोर्चाले यांनी आयुष्मान खुरानाच्या 'बाला' चित्रपटाचे लेखक आणि निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. खक निरेन भट्ट आणि 'बाला'ची निर्माती संस्था मॅडॉक फिल्म्सनं आपली पटकथा उचलली असल्याचा दावा प्रवीण यांनी केला.