पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मानच्या 'बाला'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

बाला

आयुष्मान खुरानाच्या वादात सापडलेल्या 'बाला'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई  केली आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं  ४० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अकाली टक्कल पडणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे.

बेल बॉटम : गुप्तहेरांच्या विश्वातली थरारक कथा, अक्षय प्रमुख भूमिकेत

समीक्षकांकडून कौतुक झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला आहे.  चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार 'बाला'नं  पहिल्या आठवड्यात ४३.९५ कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटानं १०. १५ कोटींचा, शनिवारी १५.७३ कोटींचा आणि रविवारी १८.०७ कोटींचा गल्ला चित्रपटानं कमावला आहे.

'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक

आयुष्मानसोबत भूमी  पेडणेकर आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. 'बाला'  हा २०१९ या वर्षांतला  आयुष्मानचा  तिसरा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल १५' नं २०.४ कोटींची कमाई केली होती. तर 'ड्रिम गर्ल'नं ४४.५७ कोटींचा गल्ला जमवला होता. 

अजय देवगनच्या चित्रपटांचं शतक, 'तान्हाजी' ठरला १०० वा चित्रपट