पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ब्रह्मास्त्र'साठी करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा, चाहत्यांचा हिरमोड

'ब्रह्मास्त्र'

आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची सर्वच चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण बॉलिवूडमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आयाननं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. हा चित्रपट आता २०१९ ऐवजी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'मी  २०११ मध्ये या चित्रपटाचं स्वप्न पाहिलं होतं. २०१३ मध्ये ये जवानी है दिवानी प्रदर्शित झाला तेव्हापासून मी माझ्या स्वप्नांचा मागोवा घेत आहे. मला संपूर्ण भारतासमोर अशी कथा आणायची होती जी पूर्णपणे नवी असेन तिचा गाभा, त्यातली पात्र हे सारं यापूर्वी कधीही न अनुभवलेलं असेन. मात्र या  चित्रपटावर काम करताना बऱ्याच गोष्टींवर अजूनही मेहनत घ्यायची आहे हे माझ्या लक्षात आलं.

चित्रपटातील संपूर्ण व्हीएफएक्स टीम ग्राफिक्स आणि साऊंड्सच्या कामात व्यग्र आहे. एक दमदार चित्रपट बनवण्यासाठी टीम दिवसरात्र झटत आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. '  असं आयाननं म्हटलं आहे.त्यामुळे हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित न होता २०२० मध्ये उन्हाळ्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आयाननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख लवकरच ठरवण्यात येईल असंही आयान म्हणाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Release Date 💥 #brahmastra

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji) on


'ब्रह्मास्त्र' हा बॉलिवूडमधला सध्याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. मात्र प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानं चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. आधी हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. याच तारखेला सलमानचा 'दबंग ३'  देखील प्रदर्शित होत आहे.