पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम : विदेशी सुपरहिरोंचा देसी हिरोंना फटका?

‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’

आयर्न मॅन,  थॉर, ब्लॅक पँथर,  स्पायडर मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका अशा एकाहून एक सरस सुपरहिरोंचा भरणा असलेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ चा शेवटचा भाग अखेर प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानं अनेक विक्रम मोडीत काढले आहे.  भारतीय प्रेक्षकांची भरभरून पसंती या चित्रपटाला मिळत आहे.  चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीला आठवडाभर आधीच सुरुवात झाली असून प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये दर सेकंदाला १८ या वेगाने या चित्रपटाची तिकीटविक्री होताना  दिसत आहे.


भारतात अॅव्हेंजर्सची क्रेझ असली तरी  देशी चित्रपटांना याचा मोठा फटका बसू शकतो.  ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ चे  शंभरहून अधिक शहरात दररोज एक हजारपेक्षा अधिक शो होणार असल्याचं समजत आहे. सध्या कलंक, रोमियो अकबर वॉल्टर, द ताश्कंद फाइल्स हे बॉलीवूडपट चित्रपटगृहात आहे. मराठीमध्ये ‘मिरांडा हाऊस’, ‘वेडिंगचा शिनेमा’ हे चित्रपटही प्रदर्शित झाले आहे. आज  ‘कागर’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे. मात्र अॅव्हेंजर्सची भारतीय प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता या चित्रपटाला जास्त स्क्रीन दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.  जर असं झालं तर मात्र भारतीय हिरोंना या विदेशी सुपरहिरोंचा जबरदस्त फटका बसू शकतो. 


विशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबईत या चित्रपटाला सर्वाधिक मागणी आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवस आधीच हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. बुकिंगच्या बाबतीत येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल ३२ सुपरहिरो असलेल्या या चित्रपटात निर्मात्यांनी एक हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.  गेल्यावर्षी भारतात प्रदर्शित झालेल्या 'अॅव्हेंजर्स:  इनफिनीटी वॉर' या चित्रपटानं २०० कोटींचा गल्ला जमवला होता. आता शेवटचा भाग भारतात किती कमाई करतो हे पाहण्यासारखं ठरेल.