पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : 'पृथ्वीराज'च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी मानुषी- अक्षयची मुहूर्तपूजा

पृथ्वीराज

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असलेला 'पृथ्वीराज' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे पण तत्पुर्वी चित्रपटाची संपूर्ण टीम मुहूर्तपूजेत सहभागी झाली होती. चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी शूभ मुहूर्तावर मूर्तीपूजा झाली.

Wedding Anniversary : 'दीपवीर' दर्शनासाठी सूवर्णमंदिरात

 'पृथ्वीराज'हा ऐतिहासिकपट असून अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून २०१७ साली मिस  वर्ल्डचा किताब जिंकलेली सौंदर्यवती मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या नावाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. 

अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अक्षय पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. २०२० च्या दिवाळीत 'पृथ्वीराज' चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

प्रार्थनांना यश लतादीदींची तब्येत सुधारतेय, कुटुंबीयांची माहिती