पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आसाममधील पूरग्रस्त आणि काझीरंगासाठी अक्षयची दोन कोटींची मदत

अक्षय कुमार

आसामला पूरचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावून आला आहे. अक्षयनं पूरग्रस्तांसाठी १ कोटी आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासाठी १ कोटी असा एकूण २ कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. 

आसाममधील पूरामुळे आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ३० ते ३३ जिल्ह्यातील ४ हजार १५७ गावांचं पुरामुळे नुकसान झालं आहे. ४० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.  देशभरातून आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. अक्षयनं ट्विटरवरून मदतनिधी जाहीर केला आहे. 

आसाममध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन  विस्कळीत झालं आहे, आसामधील बातमी वाचून  मला खूपच दु:ख झालं आहे.  या पुरामुळे वाताहात झालेल्या माणसांबरोबरच प्राण्यांनाही मदतीची गरज आहे. म्हणूनच मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी आणि काझीरंगा पार्क रेस्क्यूसाठी १ कोटींची मदत जाहीर करत आहे, असं अक्षयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.