पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंगात दहा हत्तीचं बळ आलं, गोवारीकरांनी मानले राज ठाकरेंचे आभार

गोवारीकरांनी मानले राज ठाकरेंचे आभार

 'पानिपत' चित्रपटाबद्दल तुम्ही  काढलेल्या  गौरवोद्गाराबद्दल मी मनापासून  कृतज्ञता  व्यक्त  करतो. तुमच्यासारख्या  रसिक  मित्राचं  पाठबळ  मिळाल्यावर  अंगामधे दहा  हत्तींचं बळ येतं, असं म्हणत  'पानिपत'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. 

दीपिकाला साकारायचीये 'देसी सुपरवुमन'

अठराव्या शतकात हिंदूस्थानमध्ये राजकीय  आणि  सामाजिक  उलथापालथ  घडवणाऱ्या या महाप्रचंड  शौर्यगाथेला इतक्या सुंदर  आणि  मोजक्या  शब्दांत  बंदिस्त  करून "पानिपत" चित्रपटाबद्दल तुम्ही  काढलेल्या  गौरवोद्गाराबद्दल मी मनापासून  कृतज्ञता  व्यक्त  करतो, असं म्हणत  आशुतोष यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. 

 "पानिपतची लढाई ही मऱ्हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा अविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पाहावेच लागेल. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानातील प्रत्येकाने माझे मित्र आशुतोष गोवारीकर याचा चित्रपट पाहायला हवा असं, ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं.

प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं, आयुष्माननं मानले आभार

'पानिपत' च्या तिसऱ्या युद्धावर आधारित हा चित्रपट  ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.