पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील 'सविता भाभी'च्या पोस्टरमागे, अश्लील उद्योग मित्रमंडळ?

चर्चा तर होणारच

'सविता भाभी, तू इथंच थांब….' असा मजकूर लावलेलं पोस्टर पुणे शहराच्या चौकाचौकात झळकले होते. ही 'सविता भाभी' नेमकी कोण? हे पोस्टर कोणी लावले याचं कुतूहल पुणेकरांना होतं. मात्र पुण्याच्या चौकात झळकणाऱ्या या  पोस्टरबाजीमागे 'अश्लील उद्योग मित्रमंडळा'चा हात तर नाही ना? की हा निव्वळ योगायोग समजावा?  असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

'प्रत्येक चित्रपटात तुझ्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली असती तर'

आता 'अश्लील उद्योग मित्रमंडळ' हा नेमका काय प्रकार आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र हे कोणतंही 'मंडळ' नसून सई ताम्हणकर, पर्ण पेठेचा आगामी मराठी चित्रपट आहे. पुण्याच्या चौकाचौकात 'सविता भाभी'च्या नावाचे पोस्टर लागले अन् दुसऱ्याच दिवशी 'अश्लील उद्योग मित्रमंडळा'चा टीझरही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे ही या चित्रपटाची जाहीरात असावी अशी शक्यता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अख्खं शहर वाट बघतंय तुझी! #SoundOn #AUMM #6March #HandiFutnar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रमुख पात्राचं नाव 'सविता' आहे. सईनं ती साकारत असलेल्या 'सविता'ची ओळख करून दिलीये. या टीझरमध्ये 'सविता अख्खं शहर वाट बघतंय तुझी!' असं लिहिल्यानं यामागे 'अश्लील उद्योग मित्रमंडळा'चाच हात असल्याची शक्यता दुणावली आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाची ही हटके जाहिरातबाजी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

'सासूबाईं'ना जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून कामाची पोचपावती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ashlil udyog mitramadal movie hilarious promotion by putting poster of savita bhabhi tu ithech thamb