आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या नावावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेत त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी दिग्दर्शक आलोक राजवाडेकडे ही मागणी केली आहे.
ब्राह्मण महासंघानं या चित्रपटाला 'सॉफ्ट पॉर्न' चित्रपट म्हटले आहे, तसेच दिग्दर्शकांनी नावातून 'अश्लील' हा शब्द वगळावा अशी मागणी दवे यांनी केली आहे. माझा चित्रपटाला आक्षेप नाही कारण तो मी पाहिला नाही, मात्र आमचा नावाला विरोध असल्याचं ते खासगी वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.
दिल्ली हिंसाचार : हे गृहमंत्रालयाचे अपयश; रजनीकांत यांची टीका
तर अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट स्त्रियांच्या वस्तुकरणाविरोधात बोलणारा चित्रपट आहे, त्यात सामाजिक संदेश आहे. त्यामुळे यात गैर काहीच नाही. या चित्रपटाला सेन्सॉरचे U/A (अ/व) प्रमाणपत्र मिळालं आहे. अश्लील चित्रपट बनवण्याचा आमचा हेतू असता तर आम्हाला U/A प्रमाणपत्र नक्कीच मिळालं नसतं, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनं खासगी वाहिनीला दिली आहे.
सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, सायली पाठक, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ यांची भूमिक असलेला हा चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होत आहे.
Video : सविता भाभी तू इथंच थांब!, 'अश्लील उद्योग मंडळा'चं नवं गाणं