पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अग्गंबाई ! 'सासूबाईं'ना जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून कामाची पोचपावती

'सासूबाईं'ना जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून कामाची पोचपावती

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक आसावरी या व्यक्तिरेखेला देखील खूप पसंत करत आहे. आई, सून, सासू ही प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली.

सेटवरील व्यक्तीच्या निधनानंतर अपूर्वाचं आर्थिक मदतीसाठी आवाहन

आसावरीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी कौतुकाची थाप दिली आणि त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. इतकंच नव्हे तर "छान अभिनय करतेस तू. मी तुझी सीरिअल रोज पाहते." असं देखील आशा ताई म्हणाल्या. आशा ताईंनी केलेल्या कौतुकामुळे निवेदिता सराफ भारावून गेल्या. सासूबाईंना चक्क दिग्गज गायिकेकडून त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सासूबाई प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत असं म्हटंल तरी खोटं ठरणार नाही.

अग्गबाई! 'सुनबाई' तेजश्री प्रधान चक्क बॉलिवूडमध्ये