पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काळजी आहे म्हणूनच स्मृती इराणी जिंकल्या, आशा भोसलेंनी केलं कौतुक

स्मृती इराणी आशा भोसले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भाजप खासदार स्मृती इराणी यांचं कौतुक केलं आहे. शपथविधी संपल्यानंतर खूपच गर्दी झाली होती या गर्दीत स्मृती  इराणी या एकमेव अशा व्यक्ती होत्या ज्यांनी मला मदत देऊ केली आणि मी सुखरूप घरी पोहोचेन याची काळजी घेतली, अशा  शब्दांत आशाताईंनी स्मृती इराणींचं कौतुक केलं आहे. 

शपथविधी संपल्यानंतर खूपच  गर्दी झाली होती. या गर्दीत मी अडकले. कोणीही तेव्हा माझ्या मदतीला पुढे आलं नाही. मात्र अमेठीमधून निवडून आलेल्या भाजप खासदार स्मृती इराणी माझ्या मदतीला धावून आल्या. गर्दीत होणारा त्रास त्यांनी पाहिला आणि मला मदत केली. मी या गर्दीतून सुखरूप घरापर्यंत पोहोचेन यांची पूर्ण काळजी स्मृती यांनी घेतली. त्यांना खरंच सर्वांची काळजी आहे म्हणूनच त्या जिंकल्या' अशा शब्दात आशाताईंनी स्मृती इराणींचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी  राष्ट्रपती भवनात सलग दुसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी फक्त देशातूनच नाही तर जगभरातून अनेक मान्यवर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जवळपास ८ हजार पाहुण्यांच्या उपस्थिती  हा शपथविधी पार पडला. या शपथविधीसाठी  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यादेखील उपस्थित होत्या.