पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणबीर आणि आलिया पुन्हा एकदा साथ साथ

रणबीर कपूर आणि आलिया भट

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट नुकतेच मुंबईमध्ये एकमेकांसोबत दिसले. हे दोघेही लवकरच ब्रह्मास्त्र सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हे दोघे कोणत्या कामासाठी एकत्र आले, हे स्पष्ट झालेले नाही. पण आलियाच्या हातात एक फाईल असल्याचे दिसते आहे. दोघेही एका इमारतीमध्ये निघालेले असताना कॅमेऱ्यात कैद झाले. दोघेही एकदम निवांत असल्याचे या व्हिडिओतून जाणवते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Loved his shoes 😍😛 #RanbirKapoor #AliaBhatt @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

गेल्यावर्षी 'संजू' प्रदर्शित झाल्यानंतर रणबीर कपूरचा कोणताही नवा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. आलियाची भूमिका असलेला 'कलंक' सिनेमा १७ एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट आहे. ज्यामध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर या सर्वांचा समावेश आहे. 
आलिया आणि रणबीर या दोघांमधील जवळीक हा सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. नुकत्याच एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हे दोघेही एकमेकांच्या जवळ बसले होते. आलियाला पुरस्कार मिळाल्यावर तिने एका विशेष व्यक्तीचे आभारही मानले होते. आता ही विशेष व्यक्ती म्हणजे कोण यावर तिच्या चाहत्यांमध्ये एकमत झाले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#AliaBhatt and #RanbirKapoor today at a office in Worli. @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगपासून रणबीर आणि आलिया दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आमच्यातील मैत्रीला तूर्त कोणते नाव देऊ नका, असे रणबीर कपूरने म्हटले होते.