पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नानंतर अडीच वर्षांत अभिनेता अरुणोदय सिंग पत्नीपासून विभक्त

अरुणोदय सिंग

'अपहरण' या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अरुणोदय लग्नानंतर अडीच वर्षांत पत्नीपासून विभक्त झाला आहे. अरुणोदय यानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित घटस्फोटाची बातमी दिली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये अरुणोदय कॅनेडियन गर्लफ्रेंड ली एल्टॉनसोबत विवाहबंधनात अडकला  होता. लग्नापूर्वी बराच काळ ली आणि अरुणोदय एकमेकांना डेट करत होते. 

अरुणोदय अनेकदा सोशल मीडियावर आपल्या पत्नीसोबत फोटो  शेअर करायचा. ली  कॅनेडियन असली तरी भारतीय संस्कृतीत ती रुळली  होती. अनेकदा  पारंपरिक भारतीय पेहरावातही ती अरुणोदयसोबत दिसायची. अरुणोदय आणि ली हे सोशल मीडियावरील चाहत्यांच्या लाडक्या जोडप्यापैकी एक जोडपं होतं. या  दोघांच्या विभक्त होण्याच्या बातमीनं चाहत्यांनाही धक्का बसला  आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arunoday Singh (@sufisoul) on

'माझं लग्न आता तुटलं आहे. आम्ही प्रेम केलं मात्र प्रेमाच्या दुनियेत हरवलेल्या आम्हा दोघांचं नातं वास्तवात मात्र  टीकू शकलं नाही. लग्न वाचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करुन पाहिले. समुपदेशन केलं, काही काळ वेगळं राहूनही पाहिलं  मात्र यामुळे आमच्यातला  दुरावा कमी झाला  नाही तो आणखी वाढतच गेला. त्यामुळे आता इथे थांबण्यातच आम्हा दोघांचं भलं आहे. यापुढे एक चांगलं आयुष्य आम्हा दोघांच्या वाट्याला यावं हिच माझी सदिच्छा',  अशी भावनिक पोस्ट अरुणोदय यानं लिहिली आहे.