पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘मीडियम स्पाइसी’तून ४० वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतणार ही ज्येष्ठ अभिनेत्री

मीडियम स्पायसी

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला  ‘मीडियम स्पाइसी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून सिने आणि नाट्यविश्वातील  पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग तब्बल ४० वर्षांनी सिनेसृष्टीत परतणार आहेत. अरूंधती यांनी ४० वर्षांपूर्वी ‘२२ जून १८९७’ या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 

मृण्मयीची बहीण नव्या मालिकेत, शेअर केला पहिलावहिला अनुभव

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी म्हणाल्या, “४० वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगळुरुला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.” 

कोरोनामुळे मराठी कलाकारांचं होळी सेलिब्रेशन रद्द

ज्येष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग

अरूंधती नाग यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची ऊब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती यांना ही भूमिका ऑफर केली.”

अरूंधती नाग यांच्या दर्जेदार अभिनयाची प्रशंसा करताना मोहित टाकळकर म्हणतात, “ त्या जरी ज्येष्ठ अभिनेत्री असल्या तरीही आपल्या प्रगाढ अनुभवाचे ओझे घेऊन त्या सेटवर येत नाहीत. त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाचा आदर करतात आणि मग त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिरेखेवर काम करतात.”

सैफवर नाराज नाही, काजोल म्हणते सारं काही आलबेल

ल्रॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. याचित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, या युवा कलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा चित्रपट  ५ जून २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.