पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून 'रामायणा'नंतर १४ वर्षांत मनोरंजन विश्वातून लांब राहिले 'राम'

ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल

रामानंद सागर यांच्या ८० च्या दशकात आलेल्या 'रामायण' या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. भारतातला मोठा प्रेक्षकवर्ग वेळ काढून आवर्जून ही मालिका पाहत होते. या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकरली होती. या भूमिकेनं अरुण गोविल केवळ अभिनेता न राहता काही लोकांसाठी अगदी देवाच्या स्थानी आले. अनेक लोक त्यांना पाहून चक्क पायाही पडल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. या मालिकेनं त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर तर नेलं मात्र या मालिकेनंतर मनोरंजन विश्वातील नव्या संधीसाठी त्यांचे द्वार कायमचे बंद झाले.
''गेल्या १४ वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत. काही कार्यक्रमात विशेष पाहुण्याच्या भूमिकेत मी दिसलो पण पलिकडे मी काहीच केलं नाही. या मालिकेनं मला लोकप्रियता दिली मात्र माझं बॉलिवूडमधलं करिअर मात्र तिथेच थांबलं. कारण कोणताही निर्माता मला काम देत नव्हता', अशी खंत गोविल यांनी विशेष मुलाखतीत बोलून दाखवली होती. 

Happy Birthday: मराठीतला 'हँडसम हंक' अंकुश चौधरी

''रामायण सुरु होण्याआधी हिंदी चित्रपटातून मी करिअरची सुरुवात केली. मालिका संपल्यानंतर मला बॉलिवूडमध्ये परतायचं होतं मात्र,  रामाची भूमिका साकारल्यानं तुमची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा खूपच प्रभावी आहे, ती खोडून आम्ही   तुम्हाला सहाय्यक अभिनेत्याची किंवा इतर लहान-मोठ्या भूमिका देऊ शकत नाही'', असं गोविल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

''मला चित्रपटात याचमुळे काम मिळत नव्हतं. मला या क्षेत्रात ज्या पद्धतीचं काम करायचं आहे ते मला कधीही मिळू शकत नाही याची जाणीव मला झाली. मी मालिकांमध्ये दुसरं काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेकजण मला म्हणायचे 'अहो राम जी आपण हे काय करत आहात'. लोकांच्या मनात माझी प्रतिमा राम म्हणूनच होती हे तेव्हा मला प्रकर्षानं जाणवलं'', असंही त्यांनी सांगितलं. 

कोरोना विषाणू : मुंबई विमानतळावर मास्क घालून आला हा अभिनेता

''एका मालिकेनं मला देशभरातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, मान- सन्मान मिळाला मात्र दुसऱ्या बाजूला याचमुळे माझं करिअरला आळा बसला. मी आता  काम थांबवलं आहे गेल्या १४ वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत केवळ विशेष पाहुणा म्हणून क्वचीत काही कार्यक्रमानां उपस्थिती लावली असेल'' अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.जर चांगली संधी आली तर या क्षेत्रात परत यायला आवडेल असंही ते म्हणाले.