पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आर्टिकल १५'ची बॉक्स ऑफिसवर संयमी आणि सातत्यपूर्ण खेळी

आर्टिकल १५ मधील एक दृश्य

अभिनेता शाहिद कपूर याच्या 'कबीर सिंह'कडून कडवी टक्कर दिली जात असतानाही सध्या चर्चेत असलेला सिनेमा 'आर्टिकल १५' ने बॉक्स ऑफिसवर आपले बस्तान बसविले आहे. 'कबीर सिंह'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई केली असताना दुसरीकडे 'आर्टिकल १५' ने पहिल्या शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस मिळून २३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

झायरानं कदाचित दबावामुळे निर्णय घेतला असेन - अनुपम खेर

'आर्टिकल १५' हा सिनेमा त्याची कथा, आयुषमान खुराना याचा अभिनय यामुळे चर्चेत आहे. या सिनेमामध्ये आयुषमानने आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे. बॉक्सऑफिसइंडिया डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'आर्टिकल १५' ने पहिल्या सोमवारी ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाविलेली रक्कम २३.५० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत या सिनेमाने २०.०४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

२०१८ मध्ये आयुषमान खुराना याचा अभिनय असलेला 'बधाई हो' सिनेमा गाजला होता. या सिनेमानंतर 'आर्टिकल १५' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. 'बधाई हो' सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत २८ कोटी रुपयांची कमाई केली होती. 

हे निकष वापरूनच सदस्यांना नॉमिनेट करा, बिग बॉसचा आदेश

सिनेमांच्या व्यावसायिक यशाचे विश्लेषक तरण आदर्श यांनी 'आर्टिकल १५' सिनेमाने परदेशात कशी कामगिरी केली आहे, त्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Article 15 box office collection day 4 Ayushmann Khurrana film steady as Shahid Kapoors Kabir Singh aims at Rs 200 cr mark