पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीच्या हवेत श्वास घेणंही अशक्य, अभिनेत्याचा त्रासदायक अनुभव

अर्जुन रामपाल

दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. सलग चौथ्या दिवशीही इथल्या हवेचा दर्जा खालावलेला होता. येथे आरोग्य आणीबाणीही घोषित केली आहे. कामानिमित्तानं मुंबईहून दिल्लीला गेलेला अभिनेता अर्जुन रामपालनं इथला त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. 

खेळातील राजकारणावर भाष्य करणारा 'रानु' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'मी दिल्लीत आत्ताच पोहोचले. इथल्या हवेत श्वासही घेणं अशक्य आहे. जिथे तिथे धुरकं पसरलं आहे. प्रदूषणामुळे  दूषित झालेली हवा दिसतेय. लोक मास्क घालून वावरत आहेत. एक योग्य गोष्ट करण्यासाठी अजून किती सर्वानाश होताना आपण पाहणार आहोत? आपण चुकीचं वागत आहोत  हे सांगण्याची वेळ आली आहे. 'असं ट्विट अर्जुन रामपालनं केलं आहे. 

हवेतील प्रदूषणामुळे  सरकारने  ५ नोव्हेंबरपर्यंत शाळांनाही सुटी जाहीर केली आहे.