अभिनेता अर्जुन रामपाल घटस्फोटानंतर दक्षिण आफ्रिकन प्रेयसी गॅब्रिला डेमोट्रिएड्ससोबत राहत आहे. अर्जुननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेयसी गर्भवती असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
वीस वर्षांच्या संसारानंतर अर्जुननं पत्नी मेहर जेसियासोबत घटस्फोट घेतला. २०१८ मध्ये मेहर आणि अर्जुनचा घटस्फोट झाला. या जोडप्याला माहिका( १६) आणि मायरा (१३) या दोन मुली आहेत. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन प्रेयसी गॅब्रिलासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागला.
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्याच वर्षांत आपली प्रेयसी गर्भवती असल्याची आनंदाची बातमी अर्जुन रामपालने दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून गर्भवती गॅब्रिलासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत ‘नवीन बेबीसाठी धन्यवाद’ असं म्हणत त्याने गॅब्रिलाचे आभार मानले आहेत. गॅब्रिला ही मॉडेल आहे. तिने एका बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.
गॅब्रियासोबतच्या नात्यामुळे आपल्या मुलींमध्ये कोणताही दुरावा येणार नाही असं अर्जुननं खूप आधीच स्पष्ट केलं होतं. तसेच हे क्षेत्र अस्थिरतेचं आहे त्यामुळे माझ्या मुलींना मी बॉलिवूडमध्ये कधीच यायला सांगणार नाही असंही तो आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.