पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा झाला बाबा

अर्जुन रामपाल

पत्नीपासून विभक्त झालेला अभिनेता अर्जुन रामपाल हा सध्या मॉडेल गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. गॅब्रिएला ही गर्भवती होती. तिनं गोंडस मुलाला जन्म दिला असून अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. अर्जुन आणि  गॅब्रिएलावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Mission Mangal trailer : भारताच्या स्वप्नपूर्तीची असामान्य कथा

२०१८ मध्ये अर्जुननं पत्नी मेहरसोबत घटस्फोट घेतला. अर्जुन आणि मेहरला दोन मुलीदेखील आहेत. मेहरपासून विभक्त झाल्यानंतर अर्जुन मॉडेल गॅब्रिएलासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. एप्रिल महिन्यात अर्जुननं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित प्रेयसी गर्भवती असल्याची माहिती दिली. 

'बधाई हो' मधली ऑनस्क्रीन जोडी नीना- गजराज यांची लंडनमध्ये धम्माल

अर्जुनच्या दोन्ही मुली मोठ्या आहे. गॅब्रिएलासोबतच्या नात्याची मी दोघींनाही कल्पना दिली. माझ्या मुलीनं गॅब्रिएला स्वीकारावं असं मला मनापासून वाटत होतं. सुदैवानं माझ्या दोन्ही मुलींनी गॅब्रिएला स्वीकारलं असं पूर्वीच अर्जुन म्हणाला होता.