पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मलायका- अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट

मलायका- अर्जुन

अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. नुकतीच या दोघांनी अधिकृतरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिली. अर्जुनच्या वाढदिवसाचं निमित्त साधून ही जोडी अमेरिकेत सुट्ट्या व्यतीत करत आहेत. अर्जुन आणि मलायकानं न्यूयॉर्कमधल्या त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधलं. 

वयानं लहान जोडीदार निवडणाऱ्या स्त्रिला म्हातारी म्हणून हिणवतात- मलायका

या जोडीनं नुकतीच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची भेट घेतली. ऋषी कपूर हे गेल्या वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहेत. ते कॅन्सर वर तिथे उपचार घेत होते. ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार आहेत. पण तत्पुर्वी मलायका आणि अर्जुननं  ऋषी कपूर यांची भेट घेतली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank u @neetu54 n Rishi uncle for such a warm n lovely evening 🤗♥️😘#Nyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 १८ वर्षांची असताना लग्न झालं होतं, माही गिलचा खुलासा

‘घर का बच्चा अर्जुन आणि मलायका यांच्यसोबतची एक मजेशीर संध्याकाळ’ असे कॅप्शन लिहित नितू कपूर यांनी मलायका- अर्जुनचा फोटो शेअर केला. मलायकानंही हा फोटो शेअर केला.  यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. यात पाकिस्तानी अभिनेत्रींचाही समावेश होता.