पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता अर्जुन कपूर अशी करणार मदत

अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूर यानं कोरोनाविरोधात लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. अर्जुन कपूरनं पीएमकेअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक निधी देऊ केला आहे. 

त्याचबरोबर अर्जुननं गिव्ह इंडिया या संस्थेसाठीही मदत केली आहे. ही संस्था  कोरोनामुळे जॉब गमावलेल्या आणि रोजंदारीवर काम  करणाऱ्या मजुरांना आर्थिक सहाय्य करणार आहे. या संस्थेद्वारे थेट मजुरांच्या हातात पैसे जाणार आहेत. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील रोजंदारीवर काम  करणाऱ्यांदेखील अर्जुन संस्थेद्वारे मदत करणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

याव्यतिरिक्त राज्यात जे थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत त्यांनादेखील मदत करणार आहे. या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. हा रक्त पुरवठा नीट रहावा यासाठीही तो द विशिंग फॅक्टरीला मदत करणार आहे. अर्जुननं ही मदत जाहीर करताना लोकांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या 'अंग्रेजी मीडियम'चा ऑनलाइन प्रिमियर