पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भांडी घासणाऱ्या कतरिनाला अर्जुन म्हणतो ही तर 'कांताबेन २.०'

अभिनेत्री कतरिना कैफ

मनोरंजन विश्वानं ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच कलाकार हे घरीच आहेत. एरव्ही चित्रीकरणामुळे नेहमीच व्यग्र असणारे कलाकार घरी कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे. अभिनेत्री कतरिना कैफनंही सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे , ज्यात ती घरातील भांडी घासताना दिसत आहे. 

रजनीकांत यांची चित्रपटसृष्टीतील कामगारांना ५० लाखांची मदत

विशेष म्हणजे कतरिनानं भांडी घासताना काही खास टीप्सही दिल्या आहे. कतरिनानं पोस्ट शेअर केल्यानंतर अल्पावधित तिच्या पोस्टवर  अभिनेता अर्जुन कपूरची भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. 

ही तर 'कांताबेन २.०' आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया अर्जुन कपूरनं दिली आहे. इतकंच नाही तर या कामासाठी माझ्या घरात तुझं स्वागत आहे असंही अर्जुन म्हणाला आहे. कतरिनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आणि काय हवं? प्रिया- उमेश पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला