पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अप्सरा धारा ' इजिप्तमध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट

अप्सरा धारा

पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पदवीधर असणारे बंगळुरूचे डॉक्टर रमेश कामथ यांनी कोकणी भाषेतील 'जाना माना ' आणि 'आ वै जा सा ' हे यशस्वी चित्रपट दिले आहेत. 'बेटी बचाओ बेटी पढाओ ' या विषयावर आधारित 'अप्सरा धारा ' हा त्यांचा सध्याचा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे . चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन देखील कामथ यांचेच आहे. 

बेघरांसाठी प्रार्थना करा, दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता

'अप्सरा धारा ' हा  इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट  ठरला आहे. मंगलोर येथील  सार्थक शेणॉय आणि  स्वाती भट या बालकलाकारांच्या  चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बंगलोर चे सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक आणि दानशूर असणारे डॉक्टर दयानंद पै यांनी या चित्रपटात 'दयानंद' ही एक खास भूमिका साकारली आहे. 'यशाला कधीच शॉर्टकट नसतो ', असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे .

खेळातील राजकारणावर भाष्य करणारा 'रानु' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका करत आहेत आणि सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक 'पिंटो ' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच त्याची निवड कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'बाल चित्रपट 'विभागासाठी झाली आहे आणि तो बालदिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला दाखवला जाणार आहे.