पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपल भारतीय ग्राहकांसाठी आणणार स्वस्त आयफोन

आयफोन

अ‍ॅपल ही प्रसिद्ध कंपनी आपल्या  चिनी प्रतिप्रस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी खास स्वस्त आयफोन लाँच करणार आहे. अ‍ॅपल २०२० च्या सुरूवातीला भारत आणि चीनमध्ये आपला स्वस्त आयफोन लाँच करणार असल्याचं समजत आहे. 

पुढील वर्षी लाँच होणाऱ्या स्वस्त आयफोनची किंमत सध्या गुलदस्त्यातच  आहे. अ‍ॅपलच्या फोनकडे अनेकजण स्टेटस सिम्बल म्हणून पाहतात. या महागड्या फोनच्या किंमती अनेकांच्या खिशाला न परवडणाऱ्याच आहेत. एका विशिष्ठ वर्गाचा विचार करून हे फोन तयार केले आहेत.

रिलायन्स जिओ फायबर आज होणार लॉन्च; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

मात्र आता अ‍ॅपलनं आपला ग्राहकवर्ग अधिक विस्तारण्याचं ठरवलं आहे. काही ग्राहक हे फोनच्या किमतीबाबत अधिक दक्ष असतात. तेव्हा ग्राहकांना परवडतील अशा किमतीचे फोन लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे.

त्यामुळे अ‍ॅपलनं फोन लाँच केले तर ते नक्कीच हुवैई, ओप्पो, सॅमसंगला टक्कर देणारे ठरतील असा कयास बांधला जात आहे.