पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार

रेड प्रोडक्ट

अ‍ॅपल कंपनीनं बुधवारी त्यांचा बहुप्रतीक्षित असा iPhone SE 2020 लाँच केला. भारतात या फोनची किंमत ही ४२ हजार ५०० आहे. नव्यानं लाँच करण्यात आलेला आयफोन हा ब्लॅक, व्हाइट आणि लाल रंगात उपलब्ध आहे. यातल्या लाल रंगाच्या आयफोनच्या ३० सप्टेंबरपर्यंतच्या विक्रीतून येणारी ठराविक रक्कम ही कोरोना रिलिफ फंडसाठी जाणार आहे.

२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल

 iPhone SE (PRODUCT) RED च्या खरेदीनंतर त्यातील ठराविक रक्कम ही कोरोना विरोधातील लढाईसाठी उभारण्यात आलेल्या रिलिफ फंडसाठी जाणार आहे. या फंडच्या मार्फत पीपीई किट आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी निधी पुरवला जाणार आहे., अशी माहिती अ‍ॅपलनं दिली आहे.

'लॉकडाऊन हे काही कोरोनावर उत्तर नाही, तो केवळ तात्पुरता पर्याय'

यापूर्वी Product Red मधल्या उत्पादनाच्या विक्रितून येणारी रक्कम ही एचआयव्ही एड्स रिलीफ फंडसाठी जात होती. मात्र सध्या कोरोना विषाणूसारखं मोठं आर्थिक संकट घोंघावत असताना प्रोडक्ट रेडमधला निधी हा कोरोनासाठी जाणार आहे. या व्यतीरिक्त iPhone 11, the iPhone XR, iPhone 11 series लेदर केस, iPhone SE लेदर केस,  iPhone 11 series  सिलिकॉन केस,  iPhone 7 स्मार्ट बॅटरी केस, अ‍ॅपल वॉच बँड यांसारख्या उत्पादनांच्या विक्रीतून येणारी ठराविक रक्कम देखील फंडसाठी जाणार आहे.