पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी चहा नाही कॉफीच पिते, अनुष्कानं टीकाकारांना केलं क्लीन बोल्ड

विराट- अनुष्का

अनुष्का शर्मा आणि चहा प्रकरण हे सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. विश्वचषकातील सामन्यात निवड समितीमधील लोक अनुष्काला चहा आणून देताना मी पाहिले आहे, अशी टीका माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर  यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा चांगलीच चर्चेत आली होती. 

बिचाऱ्या अनुष्काचं नाव उगाच गोवलं, फारुख यांचा यु-टर्न

हे प्रकरण चर्चेत आल्यावर तिनं सोशल मीडियावर फारूख इंजिनीअर  यांच्यासह सर्व टिकाकारांना चांगलंच प्रतित्युर दिलं. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी कधीही चहा घेत नाही मी केवळ कॉफीच पिते असं तिनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट विश्वातील विराटशी निगडीत काही गोष्टींचा खापर तिच्यावर फोडणाऱ्या विरोधकांचीही तिनं कानउघडणी केली आहे. 

तब्येतीच्या कारणावरून बच्चन यांचे परदेशात कार्यक्रमास जाणं रद्द

 'विराट माझ्यातील नात्याला सुरुवात झाल्यापासून अनेकदा माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात आला. विराटच्या खराब कामगिरीचे खापर माझ्यावर फोडण्यात आले. मी ते शांतपणे सहन केले. अनुष्का शर्मा बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित असते, अशा अफवा पसरल्या गेल्या. संघ निवडीमध्ये माझा हस्तक्षेप असतो, असेही बोलले गेले. मला बीसीसीआयकडून खास पाहुणचार मिळतो. परदेशी दौऱ्यावर विराटसोबत जाण्यावरुनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. प्रोटोकॉलचे पालन करुन देखील माझ्यासंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचारावर मी शांत राहिले.  मात्र निवड समितीवर प्रश्न उपस्थित करताना त्यात माझ्या नावाचा उल्लेख करू नका, अशा गोष्टीत माझे नाव वापरण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही किंवा दिलेली नाही. एखादी व्यक्ती शांत आहे याचा अर्थ ती कमजोर आहे असे समजू नये', असं रोखठोक मत तिनं मांडलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

रोखठोक मत मांडणाऱ्या  अनुष्काला तिनं घेतलेल्या भूमिकेसाठी  रणवीर सिंह, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, सोनम कपूर, काजल अग्रवाल, जॅकलिन, परिणिती चोप्रा यांसारख्या अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

दिवाळी साजरी करण्यासाठी नेहानं स्पर्धकाला दिले १ लाख