पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनुष्का शर्मा 'फॉर्च्यून इंडिया'च्या प्रभावशाली महिलांच्या यादीत

अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा 'फॉर्चून इंडिया २०१९' च्या   पहिल्या ५० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. २००८ मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अनुष्का या यादीत ३९ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या यादीत असणाऱ्या इतर महिलांच्या तुलनेत अनुष्काचे वय सर्वात कमी आहे.  

रणवीर सिंगच्या 'गल्ली बॉय' चित्रपटाची ऑस्कर वारी

फॉर्च्यून इंडियाने अनुष्काविषयी लिहलंय की, ती केवळ काही ब्रँडसचा चेहरा नाही तर एक चित्रपट निर्माता देखील आहे. वयाच्या २५ व्या वर्षीच अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले  'क्लीन स्लेट' या आपल्या प्रोडक्शन हाउसची स्थापना केली होती. यामाध्यमाध्यमातूनच तिने  'एनएच१०', 'फिल्लौरी' आणि 'परी' सारखे अगदी अल्प खर्चातील हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती.  

KBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल

बॉक्स ऑफिसवर प्रत्येक चित्रपटाने जवळपास ४० कोटींपर्यंत कमाई केली आहे. बॉलीवूडच्या पुढे जात अनुष्काच्या प्रोडक्श्न हाऊसने नेटफ्लिक्ससोबत 'बुलबुल' या फिचर सिनेमासह 'माई' या वेब सीरीजसाठी करार केला आहे. भारतातील सर्वात शक्तीशाली महिलांची निवड करण्यासाठी वार्षिक रँकिंग ही व्यवसाय कौशल्य आणि सामाजिक, सांस्कृतिक प्रभावाच्या आधारावर दिली जाते.