बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर पडताच लगेच व्हायरल होतो. नुकताच अनुष्का आणि विरोटने फोटोशूट केलेले काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघे देखील खूप सुंदर आणि रोमँटिक दिसत आहेत. विराट कोहलीने इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्सच्या निमित्ताने अनुष्का शर्मासोबत हे फोटोशूट केले आहे.
VIDEO: सचिन तेंडुलकरने लतादीदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनुष्का शर्माने यावेळी ब्लँक पँटसोबत पीच कलरचा टॉप घातला आहे. तर विराट कोहलीने ब्लँक टक्सीडो घातला आहे. दोघे देखील या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अनुष्का शर्माने विरोट सोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला दोघांच्या चाहत्यांनी देखील खूप पसंती दिली आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.