पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झायरानं कदाचित दबावामुळे निर्णय घेतला असेन - अनुपम खेर

अनुपम खेर

अभिनेत्री झायरा वसीम हिनं बॉलिवूडमधून आपली निवृत्ती जाहिर केली आहे. तिच्या अनपेक्षित एक्झिटमुळे चाहत्यांसह बॉलिवूडमधल्या कलाकारांनाही अनपेक्षित धक्का बसला आहे. बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही झायराच्या या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे. 

'तिनं आपला  निर्णय जाहिर केल्यानंतर मला धक्का बसला. तिनं हा निर्णय कोणाच्या दबावाखाली तर घेतला नाही ना हा पहिला विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. तिनं धर्माच्या नावाखाली हा  निर्णय घेतला आहे कदाचित तो निर्णय तिचा नसावा तिच्यावर कोणाचातरी नक्कीच दबाव असेन असं मला मला वाटतं. मात्र हे तिचं आयुष्य आहे आणि तिच्या निर्णयाचा मी आदर करतो. याक्षणी तिला एकटं सोडणं  योग्य', असं अनुपम खेर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती म्हणाले. 

रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल

झायराने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आल्यापासून अल्लाह आणि माझ्यात अंतर निर्माण झाले आहे, असा उल्लेख करत तिने अभिनयातून एक्झिट करत असल्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट शेअर केली होती. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तिचे अकाउंट हॅक झाल्याची चर्चा रंगली होती. माझे सोशल मीडिया अकाउंट मी स्वत: वापरत असून अकाउंट हॅक  झालेलं नाही, अशी माहिती तिने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.