पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहरुखचा तो निर्णय योग्यच, अनुपम खेर यांचं समर्थन

शाहरूख खान- अनुपम खेर

शाहरुखचा २०१८ साली 'झिरो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पुरता आदळला.  यापूर्वी आलेल्या शाहरूखच्या 'रईस' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. 'झिरो' कडून शाहरुखला खूपच अपेक्षा होत्या, मात्र प्रेक्षकांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे शाहरूखचा हिरमोड झाला. शाहरूखनं या अपयशानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. 

'डान्स इंडिया डान्स'च्या प्रत्येक एपिसोडसाठी करिनाला सर्वाधिक मानधन?

'झिरो' प्रदर्शित होऊन सहा महिन्यांहूनही अधिक काळ लोटला शाहरूखनं अद्यापही कोणत्याही चित्रपटाला होकार दिलेला नाही. काम करण्याची इच्छा नाही, त्यामुळे आता मी कुटुंबीयांसोबत अधिक वेळ व्यतीत करणार असल्याचं शाहरूखनं सांगितलं. सध्या शाहरूखच्या वाट्याला एकही चित्रपट नाही. शाहरूख काही काळासाठी ब्रेक घेतला आहे ही बाब त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शाहरूखच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. शाहरूखनं घेतलेला निर्णय हा योग्य आहे. कधी कधी सगळ्यांपासून अलिप्त राहिल्यामुळे आपल्याला स्वत:चा शोध लागतो असं ते म्हणाले. 

त्या फोटोमुळे प्रियांका Global Social Media Climbers Chart मध्ये अव्वल

अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटांत शाहरूखसोबत काम केलं आहे. त्यातल्या बहुतेक चित्रपटात ते शाहरूखच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. गेल्या काही काळात व्यग्र वेळापत्रकामुळे शाहरूखशी संपर्क साधता आला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.